Monday, February 1, 2010

Dapoli Revisited


Hi,

          कधी-कधी प्रवास आपल्याला एका वेगळ्या विशवाची अनुभूति देऊन जातो आणि बरेच काही शिकवतोही. असाच एक प्रवास म्हणा किंवा सहल आणि फिरताना झालेल्या गमती-जमती आता मी तुमच्या बरोबर पुन्हा एकदा अनुभव्नर आहे. 
          ठिकाना बद्दल सांगायचे झाले तर ते म्हणजे भारतातले मोरिशियस (कोकण) आणि कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतो समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा. या दोन्ही रोमांचक पर्यायांपैकी निवडायचा कोणता असा प्रश्न जानेवारी-२००९ मध्ये आमच्या (महेश, विजय, अमिताभ, सुशिल-मी) समोर होता. रोजच्या कसरातिच्या दैनान्दिनितुन बाहेर पडून डोनगर चढ़ायाची हिम्मत कोणीही दाखवली नाही आणि आम्ही ठिकान ठरवले ते म्हणजे दापोली (विजय'चे गाव) दिनांक २४-जानेवारी -२००९ ते २६-जानेवारी-२००९. ती होती आमची पहेली फेरी. तेव्हाच ठरवले पुन्हा एकदा या ठिकाणी यायचे, ते पण जास्त दिवासंसाठी.   
         विचार चक्र चालू झाली ती दिवालिच्या सुट्टी नंतर. विजय'ने आम्हा सगळ्यांना फोन करून सेकंड विझिट प्लानची आठवणकरून दिली. डिसेम्बर महिन्यातील शेवटचे २ wkend आम्हाला खुनाऊ लागले, कारण सगाल्यान्नाच ४ दिवस सुट्टी मिळणार होती. तरीही जमणार नाही रे, काम आहे रे, डिसेम्बर-२५ ला नको ३१ ला जाऊ किंवा उलट अशी भंपक कारण येऊ लागली. कसे-बसे नोवेम्बर संपे पर्यंत (विजय, महेश, अमिताभ, सुशिल) डिसेम्बर ३१ ला प्रवास सुरु करायला तयार झालो. म्हणजेच मुंबई मध्ये New Year celebrate करून रात्री १ वाजे पर्यंत निघायचे ठरले. पण सह्याद्रीच्या पर्वत रांगा जश्या नागमोडी आहेत तसेच काही प्रसंग घडू लागले होते, डिसेम्बरच्या पहिला आठावाडा संपे पर्यंत २ धक्के बसले होते. महेश'ने घरी problem असल्याने माघार घेतली आणि मी खेळताना पाय तोडून घेतला त्यामुले एक आठावाडा घरी बसून होतो. डिसेम्बर-२० पर्यंत मी चालू लागलो. त्या दरम्यानच आम्ही चौथ्या member साठी शोध सुरु केला (नाहीतर budget पेलावल नसत). मी एक नाव सुचवल, विजय तयार झाला पण अमिताभ त्या व्यक्तीला आधी भेटला नव्हता म्हणून तो काच-कुच करत होता. पण तो तयार झाला. २२-डिसेम्बर'ला सकाळी विजयने मला फोन करूं सांगितले, आपण ३१-डिसेम्बर ऐवजी २४-दिसम्बेर्ला जात आहोत हे संग्न्यासाठी. माझी तयारी काहीच नव्हती आणि मला त्या चौथ्या व्यक्ति पर्यंतही हा निरोप पोहच्वायाचा होता. "आल इज वेल" म्हणत आम्ही २४-डिसेम्बर साठी सज्ज झालो. वेळ ठरली रात्री १०:३० वाजता कल्याण स्टेशन जवळ भेटायचे ठरले. 
          प्रवास सुरु करे पर्यंत ११:१५ वाजले. आपापल्या कार्य क्षेत्रात बरयापैकी जम बसलेले आणि उच्च शिक्षण घेत असताना कसून गिरवलेल्या (अनाल्य्सिस, प्लानिंग, रेसौर्स मैनेजमेंट) चे तिन तेरा वाजले होते. प्रवासाच्या सुरवातीलाच ही अवस्था तर पुढे काय असा प्रश्न आम्हा सर्वांना पडला होता. अरेच्या आम्ही कोण ते तर संगीतालेच नाही.....
१. अमिताभ - (owner of Maruti 400*2, driver with good stamina from Bengol)
२. विजय - ( वाटाड्या , क्लीनर , ज्याच्या गावी आम्ही जात होतो)
३. सुशिल - ( मी, मला पूर्ण प्रवासाचा खर्च बघायचा होता accountant)
४. कृष्णा - (आमचा चौथा मेम्बर from UP)
फ़क्त अक साउथ इंडियन मिस्सिंग होता, तसे नसते तर सम्पूर्ण भारत कोकणात आला असता. असो, प्रवासा पुर्वीच आम्ही काम वाटुन घेतली; मला accountant पद म्हणजे शेवटी कुठेतरी घपलत नक्की ह्याची जाणीव होती सर्वांनाच तरीही एकदा ठरवले म्हणजे तेच फिक्स. सुरवातीलाच अमिताभने सांगितले की गाडीची condition थोड़ी वाईट आहे आणि प्रवासात problem होऊ शकतो. छोड़ यार देखा जायेगा म्हणत आम्ही निघालो.
          सगळे घरून जेउन निघालो होतो तरीही पनवेल सोडल्यावर मुंबई-गोवा हाईवे वरील ढाब्यावर थोडास खायची इच्छा झाली, म्हणून गाड़ी थम्बवाली बाहेर कद्याकाची थंडी होती. आमची १२:३० ला शेवटची आर्डर वेटरने आणून दिली, जे खालल ते जबरदस्त तिखट होत. विजय ज्याला तिखट खायची सवय नाही त्याला ट्याव-ट्याव चा प्रॉब्लम झाला आणि तो काम तमाम करायला गेला. तो येई पर्यंत मी, कृष्णा, अमिताभ पार्किंग मध्ये उभे राहून थंडी वर उपाय काय या बद्दल गप्पा मारत होतो. अमिताभने हल्लीच सोडली होती, मी आणि कृष्णा पुस्तकी ञान पाझालत होतो. आमच्या गप्पा जरा मोठ्यानेच होत होत्या, त्या ऐकून बाजुच्या गाडीतून एक चाळीशीतला माणुस बाहेर आला. त्याला आमच्या दिशेने येताना बघून आम्ही बोलन थाम्बवल. थोडा गुंडच वाटत होता तो, आम्ही सावध झालो. मग त्याने जे उपदेश द्यायला सुरवात केले ,,,,, ह्या वयात प्यायच नाही, प्रवासात तर नाहीच नाही ,,,,,,,,,,,वगैरे वगैरे. आम्हाला तर तोच नशेत वाटला. नशीब तेवढ्यात विजय आला आणि आम्ही तिथून पलायन केले. 
            वाटाड्या थोडा नरम पडला होता. मुंबई-गोवा हाई वे वर आम्ही गाड़ी पलवत होतो, गाणीही चालू होती. आमचा वाटाड्या कधी झोपला ते कललेच नाही आणि लोणेर चा फाटा चुकला. अमिताभला थोडा डाउट आला, विजयही अचानक बोलला, अरे आपण पुढे निघून आलो. अमिताभने त्याला दोन शिव्या घातल्या, हाई वे वर यु टर्न कुठे मारणार? विजयला समजले की थोड़े पुढे गेल्यावर टोळ मार्गे दापोलित जाऊ शकतो. एका टपरीवर ह्यांनी चाहा घेतला आणि आम्ही पुढे निघालो. रस्त्याच्या दुतरफा उंच झाड़ वरती निरभ्र आकाश आणि शरीराला झोम्बनारी थंड हवा अनुभवत नाग-मोडी वलने घेत जाताना २:३० / २:४५ च्या सुमारास आम्ही गाड़ी थाम्बवाली. आम्ही ज्या मार्गावर होतो तेथे चुकूनच गाड्यांची ये जा होत असते. एका बाजूला खोल दरी, निर्मनुष्य रस्ता, आणि जंगल अश्या ठिकाणी गाड़ी थांबवून  निरभ्र आकाश्यातिल नक्श्त्रान्वर चर्चा सुरु केली. ३ च्या सुमारास आम्ही पुढे निघालो आणि पहाटे सूर्योदय कुठे बघायचा ते ठरवू लागलो. एक मतने केलशी'च्या  समुद्र किनारी जायचे ठरवले. गाणी ऐकत, गप्पा मारत आम्ही चाललो होतो तेवढ्यात अमिताभच्या लक्षात आले की कच्चा रस्ता चालू झाला आहे. वाटाड्या बोलला "काही तरी प्रॉब्लम वाटतोय, रस्ता चुकलो तर नाही?" कारण त्याच्या महिती नुसार रस्ता चांगला असायला हवा होता.  पहाटेचे ३:४५ झाले असावेत आणि रसत विचारायचा तरी कोणाला? तेवढ्यात मागुन एक कार आली, त्यांना विचारले तर ते पण खात्रीने सांगू शकले नाहीत. पण ते जात केलशिलाच होते. आम्ही त्यांच्या मागुन निघालो आणि त्या नंतरच्या १-१:३० तासात जे काही घडल ते एका horror शो मधील घड़ा-मोडीपेक्षा काही कमी नव्हते.
          काही अंतर गेल्यावर आम्हाला २ घर दिसली, विचार केला तिथे कोणाला तरी रस्ता विचारावा. अपेक्षा नव्हती की तिथे आमच्या पहुन्चाराला पहाटे ३:४५ च्या दरम्यान कोणी भेटेल आणि तसे झालेही. पण तिथे पोहचे पर्यंत गाडीतील गाणी वाजन बंद झाले होते, कोणाच्याही मोबाइल मध्ये नेटवर्क नव्हते, आणि अचानक आमची गाडीही बंद पडली..........  
"क्या हुआ बे" कृष्णा मागुन बोलला, मी डुलक्या देत साखर झोप घ्यायच्या मूड मध्ये येत होतो, पण .....
अमिताभ एकदम गोंधळला त्याने त्याच्या ड्रायविंग च्या करिअर मध्ये असे कधीच अनुभवले नव्हते. गाडीचे सगळे indicators बंद झाले होते, हेड लाइट ही येत नव्हता. काहीच नाही. बाहेर फ़क्त एका घराच्या दाराताला मंद प्रकाश दुरवरुण येत होता. एवढ्या पहाटे मदत मिळणे अशक्य होते. विजयने आणि कृष्णाने टॉर्च काढले, आम्ही जमेल तसे आणि माहिती होते तेवढे सगळे प्रयत्न केले पण व्यर्थ. शेवटी उजड़े पर्यंत वाट बघुया असे ठरवून आम्ही चौघेही गाडीत बसलो. थोडावेळ वातावरण एवढे शांत होते की त्या जंगलात टाचनिचाही आवाज आला असता. असा विचार करत मी पुन्हा झोपण्यासाठी डोळे बंद केले न केले तोच गाडीच दरवाजा कोणीतरी जोरात बंद केल्याचा आवाज आला. पाहतो तर काय विजय एकटाच टॉर्च घेउन बाहेर पडला आणि सरळ गाड़ी समोर चालू लागला. मी अमिताभ कड़े चौकशी केली , विजय कुठे जातो वगैरे काही बोलला का? म्हणून, तर तो नाही म्हणाला. आम्हाला गाडीतून फ़क्त टॉर्चचा उजेड पुढे-पुढे जाताना दिसत होता. माझ्या मानत नको-नको ते विचार येऊ लागले, मी अमिताभ आणि कृष्णाला बोललो "अरे इसके ऊपर किसीने काला जादू किया क्या, ऐसे अचानक क्या हो गया इसको?" मी असे म्हणतो ना म्हणतो, तेवढ्यात टॉर्च'चा दिसणारा उजेड बंद झाला. आता काहीतरी serious आहे, म्हणून कृष्णा आणि अमिताभही विजयला बघायला बाहेर पडले (टॉर्च न घेता) आणि समोरच्या अंधारात गायब झाले. ५ मिनिटे कोणाचाही पत्ता नाही, मला तर त्या थंडीतही घाम फूटायची वेळ आली होती. हे दोघे जेव्हा विजय'ला घेउन आले तेव्हा अमिताभ तर चांगलाच गरम झाला होता. आम्ही तिघंनिही विजयवर राग व्यक्त केला, ह्या सगळ्यामध्ये मला तर त्याच्या अश्या वागण्याचे कारण समजलेच नव्हते. विजय म्हणाला "अरे मी बघायला गेलो होतो की, इथे फ़क्त दोनच घर आहेत की गाव आहे ते!" हे ऐकून माझी हसू की रडू अशी अवस्था झाली होती.  
            झालेला गोंधळ बाजूला ठेवून आम्ही पुढचा विचार करू लागलो. पहाट होत होती, अमिताभला एका घर जवळ कोणीतरी शेकोटी पेटवताना दिसले. विजय निघाला, अमिताभ आणि कृष्णा एक मतने बोलले सुशिल तू पण जा बरोबर. तिथे गेल्यावर आम्ही त्या घरातील मावशी कड़े आसपास कुठे मदत मिळेल की नाही त्याची चौकशी केली. तेव्हा कळले की त्यांच्या बाजुच्या घरात मदत मिळू शकेल पण आम्हाला सकाळ पर्यंत वाट बघावी लागेल. आमच्याकडे दूसरा पर्यायही नव्हता. विजय आणि मी पुन्हा गाडीकडे जाण्यासाठी रस्त्यावर आलो तोच आम्हाला ट्रकचा आवाज आला. नशीब आमचे की तो ट्रकवाला आम्ही हाथ दाखवल्यावर थांबला, त्याला आम्ही सगळ सांगितल. त्याने बोनेट ओपन केले आणि तो सगळे connections चेक करू लागला. पाहतो तर काय battery ची connection wire unplugged होती. आम्ही चौघांनी एक मेकांकडे बघत राहिलो. ट्रक वाल्याने गाड़ी चालू करायला सांगितले. अमिताभने गाड़ी चालू केली आणि आमच्या जीवत जीव आला. गाड़ी सुरु झाली होती. आम्ही त्या ट्रक वाल्याचे आभार मानले आणि एक काम नक्की केले. त्यांना केलाशिचा रस्ता विचारला, ते म्हणाले आम्ही योग्य मार्गावर आहोत. 
                त्या कच्चा रस्त्यावरून आम्ही पुढे निघालो, सकाळचे ६:३० वाजले असावेत सूर्य डोक वर काढत होता आणि त्या वेळी आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या जागेचे वर्णन मी कसे करू तेच कळत नाही आहे. तुम्ही बघाच....
निसर्ग एवढा सुन्दर असू शकतो हे फ़क्त सिनेमामध्ये बघून विश्वास ठेवला होता पण आता मी स्वत: अनुभवत होतो. "या अश्या नयन रम्य ठिकाणी आपण कोना बरोबर आलो आहोत शी यक..... " अशी फीलिंग प्रत्येकाला होत होती. पण नाइलाज होता! ती सुर्याची कोवळी सोनेरी किरणे, मध्ये-मध्ये हलकेच थंड स्पर्श करून जाणारा वारा, संथ पाण्याची खळ-खळ अनुभवणे आम्हा चौघांच्याच नशिबी होते. ती एक अविस्मरनीय पहाट होती.    
जर का रात्रीच ते थरार नाट्य घडल नसत तर आम्हाला  हे 
अनुभवता आल नसत. म्हणतात ना "जे काही होते ते 
चांगल्या साठीच होते.." त्याची परिणिति त्या दिवशी झाली. केलाशित पोहचल्यावर आम्ही तेथील समुद्र किनारा बघायचा प्लान केला. अमिताभ म्हणाला आपण समुद्रत आंघोळ करू, कृष्णानेही होकर दर्शविला.  ७:३० च्या सुमारास आम्ही समुद्र किनारी पोहचलो. भल्या पहाटे समुद्रात आंघोळ करायची म्हणून सगळेच उत्साही होतो. गाड़ी काही अंतरावर थाम्बवुन आम्ही सुरुच्या झाडांची बैग पर केली आणि जे काही पाहिले त्यानंतर समुद्र जवळच्या रेतिवरही पाय ठेवायची इच्छा झाली नाही आमची. दुरवर नजर टाकली तेव्हा कळले की बरीच मंडळी आमच्या आधी तिथे पोहचली होती, मात्र ते प्रात-विधि उरकायला आले होते. ते काहीही असेल तरी निसर्ग काही आपले सौन्दर्य सोडत नाही. आता वेळ आली होती की पुढे कोणत्या ठिकाणी जायचे ते ठरवायचे. विजयने भरपूर नाव घेतली आणि तिथे पोहचायला किती वेळ लागेल तेहि अंदाजे सांगितले. आत्ता पर्यंत जे काही झाले ते लक्षात घेउन आम्ही जवळच्याच एका देवीच्या मंदिरात जायचा निर्णय घेतला. मस्त उजाडल होत, गवाकडची मंडळी शेतावर निघाली होती, ८:३० वाजून गेले तरी कोम्बडा आरावत होता. कृष्णा बोलला, "अबे सालो बिना नहाये मंदिर जा रहे हो? शरम करो!" मी पण एक dialog चिकटवला "मन साफ है हमारा............!!!!!!" मंदिर मस्त सजवल होत, आम्ही आत गेलो तर देवीच्या गभारया   भोवती पूजेची मांडणी केली असल्याने आम्हाला बाहेरुनाच दर्शन घ्यावे लागले. तेवढ्यात पाहतो तर काय २ सुन्दर तरुणी ९-वारी नेसलेल्या हातात पूजेचे ताट घेउन आत आल्या आणि आमचे पाय मंदिराच्या बाहेर निघायचे थांबले. आमचा आनंद त्याच्या मागुन आलेल्या त्यांच्या "आहों" कड़े बघून मवाळला. कोकणातील सुन्दर, सुशिक्षित, घरंदाज पण नव विवाहित मुली भल्या सकाळी बघून आम्ही मंदिरातून बाहेर निघालो. मन अति उत्साही होत होत ..........."भटकायला ओ" पण भूकही लागली होती. गाडीतून पाण्याच्या bottles काढल्या आणि आम्ही शेतात गेलो brush केल आणि biscuits हाणले.   
             पुढच destination आम्ही आन्जरले ठरवले. रस्ता तर जबरदस्त, समुद्राशी लपा-छुपी खेळत डोंगराच्या पायथ्याला शिवत पुढे जात होता. You guys definately want to see the location ना ! अश्या सुन्दर ठिकाणिही अपघात होऊ शकतात ह्याची कल्पनाच नव्हती आम्हाला. 

चित्रामधील  ती समुद्रात गेलेली दगडांची वाट दिसते आहे ना, तिला रामा'चा सेतु समजुन आमचा कृष्णा निघाला बरोबर उत्साही अमिताभही. मी आणि विजय आरामत आजू-बाजुच सौदर्य क्यामेरयत टिपट त्यांच्या मागे निघालो. फोटो काढण्यत आम्ही दोघे गुंग झालो होतो आणि अमिताभा'च्या हाकान्कडे  दुर्लक्ष्य झाले. जशे आम्ही त्यांच्या जवळ गेलो तेव्हा बघतो तर काय काही दागद एकदम लाल झाले होते आणि कृष्णा'चा  पाय रक्ताने माखला होता. "shoes भिजू नयेत म्हणून त्याने काढून ठेवले आणि मला हाक मारत असताना त्याचा तोल गेला आणि  खडकावर असलेल्या मृत शिम्पल्यान्वर त्याचा पाय कापला गेला. पुढचा सगला प्रवास त्याने एका पायावर केला.
               १०:३० वाजत आले होते आणि भूकही लागली होती. आता भरपूर टास्क करायचे होते. खाण, मलम- पट्टी, आणि निवारा. डोकी गाड़ी पेकश्या वेगाने चालू लागली, सगळ्या सोयी एकच ठिकाणी झाल्या तर बर अस वाटत होत. आन्जरले गावात शिरल्यावर भेटेल त्याच्याकडे चौकशी करत होतो. शेवटी एका ठिकाणी आमची खाण्याची आणि कृष्णा'च्या मलम-पट्टी'ची सोय झाली. जागा मस्तच होती अगदी समुद्र किनारयाला लागुन, मी आणि अमिताभने रहाण्याची सोय होऊ शकते का त्याची चौकशी केली तेव्हा कळले की पुढचे ८ दिवस दापोली आणि परिसरात रहन्यासाठी जागा मिळणे मुश्किल आहे. तरीही दापोली सिटी मध्ये काही तरी सोय होइल या आशेने आम्ही पुढे निघालो. रस्त्यात एका ठिकाणी चौकशी केली मी आणि विजयने तेव्हा तिथल्या माणसाने कुठे तरी फ़ोन करून चौकशी केली, आम्हाला एक mobile number दिला.
दापोली सिटी पासून २०-२५  की.मी. अंतरावर "लाट घर" / "तामस- तीर्थ" नावाचे ठिकान आहे. आमचा वाटाड्या पण खात्रीने जागा कशी आहे ते सांगू शकत नव्हता, समुद्र किनारी असावी अस त्याने अंदाज बांधला. 
                 बघता-बघता गोष्टी आमच्या कलाने घडू लागल्या होत्या, थोड़े बारे वाटत होते. मी आणि अमिताभ non-veg जेवन  मिळेल की नाही ह्या चिंतेत होतो. विजय आणि कृष्णा शिव्या घालू लागले. "लाट - घर" ला पोहचल्यावर आम्ही सांगितल्या गेलेल्या रहायच्या ठिकाणी शोधत-शोधत पोहचलो आणि guys it was a real heaven.........it was a group of small rooms facing beach view.......... मग काय आम्ही थकलेले जवान सामान टाकुन झोपलो, दुपार झाली होती साधारण १२:३० होउन गेले होते म्हणून डाळ- भात, भाजी-पोळी ह्यावरच समाधान मानावे लागले. पण ते सुद्धा सही होते. मी आणि अमिताभने ४:०० वाजताच रात्रीच्या जेवणाची आर्डर देऊन टाकली (कोलम्बी करी आणि fry ). कृष्णाच्या पायाला लागले होते आणि अमिताभ drive करून थकला होता, ते दोघे ७:०० वाजे पर्यंत झोपले. मी आणि विजय मात्र मस्त गोल्डेन सन-सेट  एन्जॉय केल.
           संध्याकाळच्या वेळी समुद्र किनारी नुसत शांत बसल तरी मन हलक झाल्या सारख वाटत. मनातील सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कोणाला तरी संगाव्याश्या वाटत असतात; थंड, अलगत वाहणारा  वारा त्या सर्व गोष्टी आपल्याला विचारत आहे अस अनुभव येतो.
            रात्री ८:०० नंतर आम्ही चौघेही बाहेर पडलो थोड़ी भूकही लागली होती, छान चान्दन होत. थोड़ी थान्दिही वाजत होती. coffee - चाहा प्यायला मिळाला तर बर होइल असे वाटत होते. जवळच एका cottage मध्य चौकशी केली, तर ते म्हणाले आता जेवणाच्या वेळी हे काय नको ते.  थोडा वेळ त्यांच्याशी बोलला, आजू बाजुच्या ठिकानान्बद्दल ( आमचा वाटाड्या कमी आला) . तेव्हा त्यांचा अस गैर समाज झाला की आम्ही नुकतेच मुंबईहुन आलो आहोत, म्हणून त्यांनी जेवणाच्या गड-बडीतही coffee बनवून दिली.  coffee पित असताना पोम्प्लेट फ्रायचा खमंग सगळीकड़े दरवरळला होता. अमिताभ आणि मला अजुन भूक लागु लागली. रात्री मस्त कोलम्बि फ्राय आणि करी हाणली.
              दुसरया  दिवशी निदान ८:०० वाजता तरी निघायचे असे ठरले होते, पण आम्हाला १०:०० वाजले कारण म्हणजे ...  आमच्या बाजुच्या रूम मध्ये एक फॅमिली थांबली होती. ते काका तर भलतेच उत्साही होते. ते आमच्या बरोबरच जेवायलाही होते. तेव्हा पासूनच थोड्या गप्पा- गोष्टी चालू होत्या. कृष्णा, अमिताभ आणि काका चांगलीच जोड़ी जमली होती. जेवण झाल्यावर मी आणि विजयने त्यांच्या पंगतीतुन काढता पाय घेतला. रात्री ११:३० वाजे पर्यंत ह्या तिघांची मैफिल जमली होती. काका पेग वर पेग मारत होते आणि आपली जीवन कथा (प्रेम कथा- का कोणास ठावुक पण घेतल्यावर सगळी मंडळी हेच अनुभव का बडबडतात ) ह्या दोघांना ऐकवत होते. कशी बशी त्यांनी आपली सुटका करून घेतली. उशीर झाला होता म्हणून आम्ही गुहाघरचा बेत सोडून दिला आणि पन्हाले काजी लेणी बघायला गेलो.  लेणी जास्त उंचावर नाही आहेत मात्र रस्ता नवशिक्या ड्राईवरची कसोटी घेणारा आहे. लेन्यांच्या पायथ्याशी एक नदी वाहते, आम्ही फिरून खाली उतरलो पाणी तसे उथळच होते. दुपारच्या जेवणाच्या शोधात आम्ही दाभोळ शहरात गेलो, पण काही हवे तसे मिळाले नाही. शेवटी गडित पेट्रोल भरून कोलथरेचा रस्ता धरला.
                 "अरे इथून थोड पुढे गेल्यावर चंडिका देवीचे मंदिर आहे!" आमचा वाटाड्या बोम्बलला. मंदिरात देवीची मूर्ति भुयारात ७-८ फुट खोल होती. फ़क्त पणत्या लावल्या होत्या मुख्य गाभारया पर्यंतच्या वाटेवर. विजय पुढे निघाला अचानक अंधारात गेल्याने थोडा वेळ काहीच दिसत नव्हते. २-३ पावले पुढे गेल्यावर विजय डाव्या बाजूला वळला आणि त्याच्या मागो-मग मीही पण पुढे रस्ताच नव्हता. मागुन अमिताभ ओरडत आला " अबे दिया देखके चलने नहीं होता क्या!" आम्ही दोघेही उलटे फिरलो , ३-४ पावले पुढे गेल्यावर भटजी बुवान्सराखी एक व्यक्तिरेखा दिसू लागली तेव्हा कुठे त्या अंधाराची भीत थोड़ी कमी झाली. पणत्यानच्या सौम्य प्रकाशत देवीचे दर्शन घेउन बाहेर आलो. मंदिराच्या आवारात काही वेळ फिरून आम्ही निघालो कोळथरच्या दिशेने.    
                 वाटेत कृष्णाला आम्ही जगे बद्दल चा अनुभव सांगत होतो. ३ च्या सुमारास आम्ही तिथे पोहचलो. पहिल्या खेपेस आम्हाल तिथला सूर्यास्त ज्याम आवडला होता, ह्या वेळी बहुतेक आम्ही तो मिस करू असे वाटत होते कारण खुप लवकर पोहचलो होतो ना!  पण किनारी गेल्यावर तिथून निघायचे मनच होत नव्हते. मग काय सूर्यास्त होई पर्यंत चौघेही "BOYZ TALK"  करत बसलो. विजय मधेच अति उत्साही प्राण्या प्रमाने तिकडच्या मुलांबरोबर समुद्र किनारी क्रिकेट खेळला आणि मुंबईचे नव ख़राब करून आला.                            
जस जसा दिवस संपू लागला तस तसा पूर्ण शरीराचा थाकवाही   सूर्या प्रमाने आमचा निरोप घेउन पुढच्या प्रवासासाठी आम्हाला सज्ज करून गेला. ज्याची आम्हाला खरच गरज होती, दिवस भरात सगळ काही कसलाही विग्रह न येता पर पडले होते आणि वैऱ्याची रात्र आमची वाट बघत होती. 

रात्री ८:३० च्या सुमारास गाडीचे १ टायर फाटले ते पण जंगलात. ह्या वेळी आमचे नशीबच ख़राब होते जे काही घडले ते अतिशय फ़िल्मी होते. आता मदत कुठे मगयाची आजू बाजूला वस्तिपण नव्हती, आम्ही येना-जानाऱ्या गाड्यांना हात दाखू  लागलो. १-२ गाड्या थम्बल्याही नाही, एक तर फ़क्त चौकशी करून गेला, अमिताभने नंतर चांगलेच तोंड सुख घेतले. शेवटी एक टाटा सुमो थांबली, पुढून दोघे उतरले. आम्ही त्यांना प्रोब्लेम सांगितला. तेवढ्यात बघतो तो काय त्या टाटा सुमोचे झपा-झप सगळे दरवाजे उघडले आणि  १०-१२  माणस पटा पट खाली आले. त्यावेळी जी टरकलीना , म्हटले झाल आता मारतात की काय? पण तसे काही नाही झाले ,टायर बदलायला मदत केली आणि गेरेजचा पत्ता सांगुन गेले. 
                 रात्री कॉटेजवर पोहचायला उशीर झाला, बघतो तो काय शेजारचे काका आमची वाटच बघत होते गप्पा मारायला. पण जास्त उशीर झाला होता म्हणून ते काकुंबरोबर नुकतेच जेवायला बसले होते. त्यांनी आमच्या दिवस भराच्या भ्रमंतिची विचारपूस केली. आम्ही न चुकता आमचा पहाटेचा प्लान ही सांगुन टाकला, कारण आजा रात्र जागावायाचा कोणाचाही मुड नव्हता. दुसरया दिवशी डोल्फिंस बघायला ६:३० ला निघायचे ठरले होते. कसे-बसे पहाटे आवरून आम्ही बोट पकडली, पण ह्या खेपेस डोल्फिंस काही दिसले नाही. जे काही घडत होते त्या सगळ्या निगेटिव घटनांचे खापर कृष्णाच्या माथि फोड़त होतो. सूर्योदय समुद्रात दुरवर जून पहाण्याचा आनंद आम्ही अनुभवाला तोच काय तो एक योग. तरीही काही सुंदर क्षण  आम्ही capture केले त्यातला हा एक. 
           किनारी उतरतान नावाडी म्हणाले दूसरी मंडळी जी आमच्या नन्तर डॉल्फिन बघायला जाणार होती त्यांनी विचारले तर सांगा की डॉल्फिन दिसले म्हणून. किनारयावर दोन मोठ्या फॅमिली अंदाजे १५ माणस बच्चा कंपनी धरून वाट बघत होती. सवयी प्रमाणेच १-२ बायका (काकू'स) आम्हाला विचारू लागल्या - दिसले का हो डॉल्फिन? , किती होते? जवळ होते की लाम्ब? मी आणि कृष्णा फ़क्त हो म्हणालो आणि पुढे निघालो. विजय अणि अमिताभ मागच्या वर्षी  डोल्फिंस पाहिलेले किस्से सांगुन आमच्या कड़े आले.  निराशा कशी घालवायाची? आम्ही विचार करू लागलो. अमिताभ टी-शर्ट काढून समुद्राच्या दिशेने निघाला , त्याने एकदा विचारले "कोइ  आ राह है क्या?" कृष्णा ज्याचा एक पाय आधीच जखमी होता तो एका पायावर तयार झाला. मी आणि विजय त्यांचे कपडे पकडून किनारीच चालत होतो. मग मलाही रहवाले नाही. विजयला हँगर बनवून मीही समुद्रात गेलो. उंच उसळनारय लाटनमध्ये सुर मारायला जाम मजा आली. पोहत-पोहतच आम्ही कोटेज पर्यंत आलो. 
                            मग काय, झाल संपला आमचा मुक्काम हो! घरी परत जातानाही गाडीने दोनदा धोका दिला, पण तो पर्यंत चांगलीच सवय झाली होती टायर बदलयाची. आम्ही जिथे-जिथे थामब्लो (पोटा-पाण्यासाठी) ती सगळी ठिकाणे नवीन चालू  झालेली होती त्यामुले थोड़ी रोयल ट्रीटमेंट मिळत होती. आता एकच प्रश्न प्रकर्षाने मनात येत होता पुढची सफ़र कुठे? काही सुचत असेल तर सांगा (* तुम्ही येऊ शकता वाटाड्या म्हणून). ती ही अशीच कायम आठवणित ठेवून ह्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगायला आवडेल. तसे बघायला गेलो तर रोजच काहिना काही घडत असतेच, अरे हो ह्या वरुण आठवल, तुम्हालाही आठवतय का २६ जुलै-२००५? कसे विसरु तो दिवस खास करून आपण मुंबईकर. मग काय तुम्हीही लिहा, मीही लिहितो. तो पर्यंत ट्रिप फिक्स होईलच आमची.